वि.अ/स.वि.आ. विभागीय परीक्षा
न्याय निर्णय-११
Kone Elevators V/s Tamil Nadu & Others
घटनाक्रम:
1. Otis Elevators प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने १९६९ साली निर्णय दिला होता की उदवाहनाचे उत्पादन, पुरवठा, मांडणी आणि चालू करून देणे(manufacture, supply,installation and commissioning of lift)हा व्यवहार “कार्यकंत्राट” आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्रात अशा व्यवहारांना “कार्यकंत्राट” मानले जात होते.
2. सर्वोच्च न्यायालयाने (३ न्यायमूर्तींचे खंडपीठ/Division bench)दिनांक १७-२-२००५ रोजी निर्णय दिला की उदवाहनाचे उत्पादन, पुरवठा, मांडणी आणि चालू करून देणे हा व्यवहार “विक्री” आहे.
3. दिनांक १२-९-२००६ रोजी जारी केलेल्या महाराष्ट्राच्या परिपत्रकात या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची दखल घेऊन निर्देश देण्यात आले की जर सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणासारखी वस्तुस्थिती असल्यास सदर व्यवहारास “विक्री/Sale simpliciter” मानण्यात यावे , अन्यथा “कार्यकंत्राट” मानण्यात यावे. तसेच, ३१-३-२००६ पर्यंतच्या व्यवहारांना “कार्यकंत्राट”च मानले जावे असे सुचविण्यात आले होते.
4. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १७-२-२००५ रोजीच्या निर्णयात काही न्यायालयाच्या काही निर्णयांची नोंद घेतलेली नसल्याने सदर निर्णयावर फेरविचार होण्यासाठी प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे (५ न्यायमूर्ती/Constitution Bench) सादर करण्यात आले. या खंडपीठाने दिनांक ६ मे २०१४ रोजी निर्णय दिला आहे व सदर व्यवहार “कार्यकंत्राट” असल्याचे जाहीर केले आहे. यापूर्वीचा दिनांक १७-२-२००५ चा सर्वोच्च न्यायालयाचा Kone Elevators निर्णय रद्दबातल ठरविला आहे.
Kone Elevators प्रकरणात कंत्राट संमिश्र (composite)स्वरूपाचे होते, ज्यामध्ये उद्वाहनाची विक्री आणि उद्वाहन चालू करण्याचा/commissioning समावेश होता. उद्वाहन चालू करताना अनेक तांत्रिक गोष्टी महत्वाच्या असतात. काही राज्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून याविषयी कायदे अस्तित्वात आहेत. या प्रकरणातील कंत्राट मूल्य देखील संमिश्र (composite)होते. या प्रकरणात अनेक राज्ये प्रतिवादी होती व त्यापैक्की काही राज्ये सदर व्यवहार “मालाची विक्री” असल्याचा दावा करत होती. महाराष्ट्र आणि भारत सरकार मात्र सदर व्यवहार “कार्यकंत्राट” असल्याचा दावा करत होते.
महाराष्ट्राच्या वकिलांनी “lift” या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ खालील प्रमाणे विषद केला:
a “hoisting mechanism” equipped with a car which moves in a substantially vertical direction, is worked by power and is designed to carry passengers or goods or both; and “lift installation” which includes the lift car, the lift way, the lift way enclosure and the operating mechanism of the lift and all ropes, cables, wires and plant, directly connected with the operation of the lift.
या अर्थावरून देखील हे स्पष्ट होते की उद्वाहन म्हणजे नुसते एक केबिन नाही तर ती एक यंत्रणा(mechanism) आहे, ज्यामुळे प्रवासी अथवा मालाची उभी वाहतूक केली जाते
सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले की जर कंत्राट संमिश्र नसते व जर मालाच्या पुरवठ्याचे व श्रमाचे (labour)कंत्राट स्वतंत्र असती व त्यचा मोबदला देखील जर स्वंतत्र असता तर मात्र मालाची विक्री /Sale simpliciter झाली असे मानता आली असती.
(सोबत निर्णय देत आहे)
" Courtsey MVAT Study Circle Facebook Group"