वातानुकुलीत उपहारगृह (AC Restaurants & VAT)
मे . अमरजीत रिसोर्ट्स ने १-५-२०११ नंतर वातानुकुलीत उपहारगृहात मद्य आणि खाद्य पदार्थ पुरविल्यास विक्री किंमत काय असेल हा प्रश्न DDQ अर्जात विचारला होता.
व्यापाऱ्याने युक्तिवाद केला होता की वातानुकुलीत उपहारगृहात मद्य व अन्न पदार्थ पुरविल्यास त्यास सेवा कराची आकारणी होते. सेवा कराची आकारणी संपूर्ण विक्री किंमतीवर होत नाही तर त्यास ७०% वजावट देऊन मग उर्वरित ३०% विक्री किंमतीवर सेवाकर आकारणी होते. या कारणास्तव अशा व्यवहारावर विक्री किंमतीच्या ७०% रक्कमेवरच मुल्यवर्धित कराची आकारणी केली जावी, अन्यथा एका व्यवहारावर दोन कर आकारले जातील, जे अन्यायकारक आहे. .
आयुक्तांनी व्यापाऱ्याचा हा दावा फेटाळला आहे. सदर DDQ आदेशात अनेक न्याय निर्णयांची चर्चा करण्यात आली आहे.
वातानुकुलीत उपहारगृहात देखील खाद्य पदार्थ अथवा मद्य पुरविले असले आणि त्यावर जरी सेवा कर लागू झाला असेल तरी देखील कोणतीही वजावट न देता संपूर्ण विक्री किंमतीवर मुल्यवर्धित कराची आकारणी करणे आवश्यक आहे असा आदेश आयुक्तांनी दिला आहे.
हा DDQ आदेश (दिनांक १६-१०-२०१४) विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे , जरूर वाचा
" Courtsey MVAT Study Circle Facebook Group"