लोड शेडींग आणि मूल्यवर्धित कर
मुंबई बाहेरील आपले अनेक मित्र आहेत ज्यांना लोड शेडींग ला सामोरे जावे लागते आणि म्हणून साहजिकच Inverter/ UPS ची विक्रीची उलाढाल मोठ्या प्रमाणावर होत असते.
एका व्यापाऱ्याने DDQ मध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नावर Inverter आणि UPS या दोन्ही वस्तू एकच आहेत की वेगळ्या आणि त्यावर कराचा दर काय आहे या विषयी चर्चा आहे.
व्यापाऱ्याने दावा केला होता की सदर वस्तू Schedule Entry C-56 मध्ये बसते.
Schedule Entry C-56 ची नोंद खालील प्रमाणे आहे:
IT (information technology) products as may be notified by the State Government from time to time.
या नोंदीखाली जारी केलेल्या अधिसूचने मध्ये आपल्याला प्रस्तुत चर्चेशी संबंधित नोंद खालील प्रमाणे आहे:
“8504-(UPS) Uninterrupted Power Supplies) and their parts.”
या नोंदीतील ८५०४ हा क्रमांक Central Excise Tariff heading आहे. Central Excise Tariff ८५०४ खालील प्रमाणे आहे:
“८५०४ Electrical transformers, static converters(for example rectifiers)and inductors.”
इथे एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. आपल्या अधिसूचनेमध्ये जरी Central Excise Tariff heading दर्शविण्यात आला असला तरी, जे वर्णन अधिसूचनेत केले आहे अशाच वस्तूचा समावेश अधिसूचनेच्या प्रयोजनार्थ होतो.(कृपया अधिसूचनेतील टीप वाचा)
या दोन्ही वस्तूंमध्ये फरक एका महत्वाच्या मुद्द्यावर केला गेला आहे. Uninterrupted Power Supplies, प्रामुख्याने संगणकाला विना व्यत्यय/अखंड वीज पुरवठा होण्याच्या दृष्टीने तयार केला जातो. वीज पुरवठा खंडीत झाल्यावर UPS चा “switch over time” Inverter पेक्षा खूप कमी असतो (मिली सेकंदांचा फरक).
Inverter चा वापर मुख्यत्वे करून अन्य विद्युत उपकरणांसाठी केला जातो ज्यासाठी थोड्या कालावधीसाठी वीज खंडीत झाल्याने खूप काही बिघडत नाही. मात्र संगणकासाठीचा वीज पुरवठा जर खंडीत झाला तर संगणकातील अत्यंत महत्वाची माहिती नष्ट होऊ शकते, त्यामुळे संगणकासाठी UPS अधिक महत्वाचे आहे.
या एका महत्वाच्या कारणाने UPS आणि Inverter मध्ये फरक करण्यात आला आहे. UPS चा समावेश Schedule Entry C-56 मध्ये केला आहे(5%) तर Inverter चे वर्गीकरण Residuary entry (E-1- 12.5%) मध्ये करण्यात आले आहे.
आपल्या पैक्की कुणाकडे जर UPS/Inverter चे प्रकरण असल्यास हा दिनांक ३-९-२०१३ आदेश (Crompton Greaves)वाचूनच लेखा परीक्षण करावे. सदर आदेश आपल्या संकेत-स्थळावर उपलब्ध आहेच परंतु आपल्या त्वरित संदर्भासाठी सोबत देत आहे.
Most of the computers run with a CPU ( with inbulit UPS). In this case, the UPS unit is already a part of the CPU which comprises a whole " computer" unit. THus, it will be unwise to treat this UPS part seperately as far as the cost is concern.
We also know that the seperate "UPS" unit is used for domestic and industrial usage as a power back up unit. In this case, as it is not used for the computer unit exclusively, it has to be treated as a diffent entity for the cost conideration.
" Courtsey MVAT Study Circle Facebook Group"